| पनवेल | प्रतिनिधी
पोलीस असल्याचे भासवून बहात्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि एक तोळ्याची अंगठी घेऊन दोन अनोळखी इसम पसार झाले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
24 जुलै रोजी राधाकृष्ण मेनन (रा. तक्का कॉलनी) हे चिकन घेण्यासाठी गेले. चिकन घेऊन ते साई लॉज, तक्का समोरील रस्त्यावर आले असता लाल रंगाच्या मोटरसायकल वरून इसम आले आणि मी पोलीस असून पिशवीत काय आहे हे तपासायचे आहे असे बोलला. त्यावेळी गळ्यातील चेन आणि अंगठी काढून द्या ते तपासायचे आहे असे बोलले. यावेळी त्यांनी अंगठी आणि चैन त्यांच्याकडे दिली. त्यानंतर सोन्याची चैन व अंगठी मेनन यांच्या पिशवीत टाकल्यासारखे भासवले आणि तुम्ही घरी जा असे सांगितले. ते पिशवी घेऊन घरी आले. यावेळी त्यांनी चैन आणि अंगठी पिशवीत तपासली असता ते दिसून आले नाही.






