| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंग्लंड दौर्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत टीम इंडियाला विजयी टक्केवारी व्यवस्थित ठेवण्याचं आव्हान आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआयने कसोटी संघाची सूत्र शुबमन गिलकडे सोपवली आहेत. शुबमन गिलच्या नेतृत्वातील संघात नितीश कुमार रेड्डी याचाही समावेश आहे.
अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती असलेला नितीश कुमार रेड्डी या निवडीमुळे खूश आहे. पण दुसरीकडे, त्याला एका बातमीने धक्का बसला आहे. त्याचं नाव वापरून सोशल मीडियावर फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे.
नितीश कुमार रेड्डीने लिहिले की, माझ्या मित्रांनो, गेल्या काही काळापासून मला असे अनेक मेसेज येत आहेत की माझ्या नावाने अनेक अकाउंट चालवले जात आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे माझे खरे अकाउंट आहे. म्हणून कृपया माझ्या नावाने चालवल्या जाणार्या इतर प्रोफाइलमध्ये सामील होऊ नका आणि त्यांची तक्रार करा.
फेक अकाउंटचा सामना करणारा नितीश कुमार रेड्डी हा एकमेक क्रिकेटपटू नाही. सोशल मीडियावर मागच्या काही वर्षात फेक अकाउंट तयार करून फसवणूक करण्याचे अनेक प्रकार घडत आहेत.