| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील रहिवाशी आणि रायगड जिल्हा परिषद मधील वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ. सागर काटे यांनी अन्य सात आरोपी यांनी नोकरीचे आमिष दाखवून चार जणांना गंडा घातला आहे. त्यातील तीन जणांना रेल्वेत नोकरी लावतो म्हणून आणि एकाला मंत्रालयात ड्रॉयव्हर म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. दरम्यान, नेरळ पोलीस ठाण्यात त्याबाबत गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर अन्य सहा आरोपी फरार आहेत.
फसवणूक करून पैसे लुबाडण्याचा रॅकेट चालविणाऱ्या आठ जाणणारी अनेकांना गंडा घातला आहे. त्यामुळे अशा लोकांनी नेरळ पोलीस ठाण्यात येऊन आपल्या तक्ररी दाखल कराव्यात. फरार सर्व आरोपींची कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ नेरळ पोलीस ठाणे यांना कळवावे.
नितीन मंडलिक तपासी अधिकारी, पोलीस उप निरिरक्षक
