| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
सध्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अनेक प्रकारचे रिल्स त्याचप्रमाणे विविध जाहिराती दाखवल्या जातात. त्यामध्येच एक केरला गव्हर्मेंट नावाची लॉटरी, प्रति दिवस 25 कोटी रुपये बक्षीस, सोडत दुपारी 3.00 वाजता व सायंकाळी 7.00 वाजता अशाप्रकारे जाहिरात करण्यात येत आहे. या लॉटरीचे एक ऑनलाईन तिकीट घेतल्यानंतर ड्रॉची वेळ होऊन गेल्यानंतर ऑनलाईन रिझल्ट पाठवला जातो. जेवढ्या ग्राहकांनी ऑनलाईन तिकिटे खरेदी केलेली आहेत, त्याच नंबरचे रिझल्ट या ऑनलाईन रिझल्टमध्ये दाखविले जातात. या लॉटरीचा रिझल्ट पाहिल्यानंतर 25 लाखाचे, 25 कोटीचे, 12 कोटीचे किंवा 12 बारा लाखाचे बक्षीस लागले आहे ते समजुन येते. त्यानंर व्हाट्सअप कॉलिंगद्वारे संपर्क करणाऱ्या व्यक्तीला बक्षीस लागल्याचे कळवल्यानंतर त्या व्यक्तीकडून आपला बँक पासबुकचा फोटो व एक पासपोर्ट साईज फोटो मागवण्यात येतो. त्यानंतर मेसेज येतो की, एक तासामध्ये ॲप्रूव्हल पाठवले जाईल व त्यानंतर आपल्या खात्यामध्ये संबंधित रक्कम जमा होईल. साधारण तासाभरानंतर व्हॉटस्अप कॉलिंगद्वारे मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीचा पुन्हा कॉल येतो. त्याच्याकडून सांगण्यात येते की, खात्यात लवकरच पैसे जमा होतील; परंतु, त्याचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 5 हजार 500 रूपये दिलेल्या स्कॅनर वर पाठवावे लागतील. त्यानंतरच आपल्या खात्यात पैसे जमा होतील. मात्र, ही रक्कम पाठवल्यानंतर समोरून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळत नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अशाच प्रकारच्या जाहिराती इन्स्टाग्रामवरती श्री स्वामी समर्थ फायनान्स नावाने देखील दाखविल्या जात आहेत. काही केसेसमध्ये पोलीस यंत्रणा देखील हतबल होते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे व अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
गव्हर्मेंट लॉटरीच्या नावाखाली फसवणूक

xr:d:DAFiUNjonyk:4,j:46679222290,t:23050809