मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर

| कर्जत | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराज मंडळ पाटील आळी, कर्जत यांच्या वतीने माजी आमदार स्व. तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान, कर्जत, दादर- मुंबईतील ज्योविस आयुर्वेद आणि नारी सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर व मोफत औषधे वाटप शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 302 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या 38 व्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन ज्योविस आयुर्वेदाचे डॉ. राज सातपुते यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. याप्रसंगी डॉ. ज्योती सातपुते, नगरसेवक महेंद्र चंदन, राजाभाऊ कोठारी, मंडळाचे अध्यक्ष गजानन गुरव, अशोक शिंदे, दत्तात्रेय म्हसे, पंछी गुप्ता, हरीशचंद्र राऊत, संतोष पिंगळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश सुर्वे, मनीषा सुर्वे आदी उपस्थित होते. गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कोठारी यांनी प्रस्ताविकात मंडळाच्या साठ वर्षातील उपक्रमांची माहिती दिली.

Exit mobile version