बिरवाडीत मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर

| रोहा | प्रतिनिधी |

खांबेरे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने निलिकॉन फूड अँड डाईज, लायन्स क्लब रोहा व लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग यांच्या सहकार्याने 3 ऑगस्ट रोजी बिरवाडी येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 42 जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी 27 मोतीबिंदूग्रस्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

या शिबिराचे उद्घाटन रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेश मढवी व जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन हेमंत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या डॉ. शुभदा कुरतडकर, डॉ. अमोद केळकर, डॉ. शुभम जाधव, सुजित पाटील यांनी नेत्रतपासणी केली.

या शिबिरात आदिवासी बांधवांनी गर्दी केली होती. स्थानिक आशा सेविका रसिका सावंत, आरोग्य सेविका सुषमा खेरटकर तसेच बिरवाडी ग्रामस्थ यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले. ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रा.पं. सदस्य आतिष मोरे व जितेंद्र जोशी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच दुर्गम भागात नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

Exit mobile version