चेंढरेत मोफत नेत्रतपासणी शिबीर

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड थळ यांच्या सौजन्याने लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंड लायन्स हेल्थ फाऊंडेशन, चोंढी व लायन्स प्रियदर्शनी पाटील डीसी अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविका यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच चेंढरे ग्रामपंचायत सभागृहामध्ये यशस्वीरित्या संपन्न झाले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण रायगड जिल्हा परिषद नितीन मंडलिक, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी सहाय्यक संचालक आरोग्य कुष्ठरोग तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जनसंपर्क अधिकारी, आरसीएफ लिमिटेड, थळचे संतोष वझे, आयसीडीएस प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच चेंढरे ग्रामपंचायत सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच प्रणिता म्हात्रे, डी.सी अंगणवाडी ला. प्रियदर्शनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली.

यावेळी लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे ट्रस्टी ला. प्रवीण सरनाईक, ला. संजय पाटील, सीईओ शुभदा कुडतरकर, लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंडच्या अध्यक्षा ला. जान्हवी आगाशे, खजिनदार ला. अपर्णा पाटील, सचिव ला. शिल्पा कवळे, ला. प्रितम गांधी, ला. चित्रा लोंढे, ला. ज्योत्स्ना चौगुले, ला. माया दुबल, ला. अंजली जोशी, ला. श्रुती सरनाईक, ला. समिधा चांदोरकर, पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील, कल्पिता साळगावकर, गीताई कटोर, सामिया पेरेकर, विनोदीनी मोकल, दीप्ती मोकल इत्यादी मान्यवरांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन डीसी अंगणवाडी प्रियदर्शनी पाटील यांनी केले. यावेळी 137 महिलांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला. यावेळी डॉ. प्रताप शिंदे यांनी आरोग्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक तसेच जनसंपर्क अधिकारी संतोष वझे यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या, तर प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांनी या उपक्रमाबद्दल लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंडचे तसेच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड थळचे आभार मानले.

Exit mobile version