| सोगाव | वार्ताहर |
दी लाईफ फाउंडेशन द्वारा अलिबाग तालुक्यातील गरीब-गरजू रुग्णांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चष्म्याचा नंबर लागलेल्या लाभार्थींना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. शिबीर मंगळवार, दि.20 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत रायगड जिल्हा परिषद शाळा झिराड येथे आयोजित केले आहे, तसेच बुधवार, दि.21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत रायगड जिल्हा परिषद शाळा वरसोली येथे आयोजित केले आहे. तरी या शिबिराचा गरीब-गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा व इच्छुक रुग्णांनी शिलानंद इंगळे 9325054280, प्रणय ओव्हाळ 8149437371 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन दी लाईफ फाऊंडेशन द्वारा करण्यात येत आहे.