ग्रामस्थांना मोफत पीठ दळण सेवा

ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

| रसायनी | वार्ताहर |

रसायनीतील वावेघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच गीतांजली गुरुनाथ गाताडे यांच्या वाढदिवसानिमित्त वावेघर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वावेघर, दापिवली आदी ग्रामस्थांसाठी मोफत पीठ दळण चक्कीचे उद्घाटन सरपंच गीतांजली गाताडे व जगन्नाथ चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांची घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी नसणाऱ्या ग्रामस्थांना या मोफत पीठ दळणाचा लाभ मिळणार आहे. ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. दरम्यान दापिवली गावाची पाणी समस्या सुटावी तसेच ग्रामस्थांना 24 तास पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषद शाळेजवळ जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ग्रामसेवक निवृत्ती आंधळे, गीतांजली गाताडे, जगन्नाथ चव्हाण, गुरुनाथ गाताडे, भावेश माळी, अमृता माळी, मनोज केदारी, रेश्मा माळी, रामचंद्र माने, पारुबाई राठोड, ऋतिका माळी, रवि राठोड, शारु चव्हाण, दिपक बरवी, निशा घरत, उर्मिला खारकर आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version