| पनवेल | वार्ताहर |
पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व रा.स्व. संघ जनकल्याण समिती डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात पनवेल, नवी मुंबईमधील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिराचे उद्घाटन सल्लागार ज्येष्ठ पत्रकार ुनील पोतदार यांच्या हस्ते, शिबिरासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ईसीजी कक्षाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, बीएमडी कक्षाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, तर लॅब कक्षाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी व ज्येष्ठ पत्रकार दीपक महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये सीबीसी, ईसीजी, इएनटी, बी.पी., एच.बी.ए. 1 सी या चाचण्या करण्यात मोफत करण्यात आल्या.
या कार्यक्रमास पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, कार्याध्यक्ष संजय कदम, सरचिटणीस संतोष सुतार, सहसचिव अनिल कुरघोडे, उपाध्यक्ष आनंद पवार, रवींद्र गायकवाड, खजिनदार हरेश साठे, अकबर सय्यद, अनिल भोळे, सुनील कटेकर, मयूर तांबडे, संतोष भगत, विशाल सावंत, गणपत वारगडा, किरण बाथम, शेखर भोपी, तुळशीराम बोरीले, राजेंद्र कांबळे, गौरव जहागीरदार, अनिल राय, नाना चौधरी, शैलेश चव्हाण, विकास पाटील, सुनील वारगडा, संतोष आमले, राजू गाडे, प्रगती दांडेकर, प्रतीक वेदपाठक, आदी पत्रकारांसह रा.स्व संघ जनकल्याण समितीचे प्रकल्प सचिव राजीव समेळ, व्यवस्थापक सुनील लगाटे, समाजसेवक रवींद्र पाटील उपस्थित होते.





