मोफत आरोग्य तपासणी शिबीर

। धाटाव । वार्ताहर ।

सद्गुरु कृपा फार्म बारशेत, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टर नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने बारशेत येथे गुरुवारी (दि.18) आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. या शिबिरात 200 पेक्षा जास्त रुग्णांनी सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला. तज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली. ज्यामध्ये रक्तदाब, शुगर, नेत्र तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला समाविष्ट होता. गरजू रुग्णांना मोफत औषधे आणि चष्मे देखील वाटण्यात आले.

शिबिरादरम्यान हृदयाची अँजिओप्लास्टी, हाडांची शस्त्रक्रिया, किडनीशी संबंधित आजारांवर उपचार, तसेच इतर अनेक शस्त्रक्रिया तेरणा हॉस्पिटल, नेरुळ मधील डॉ. अजित निळे, डॉ. अधिक लोखंडे इत्यादी अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येणार आहेत

Exit mobile version