नेरळमध्ये मोफत कराटे प्रशिक्षण

| नेरळ | प्रतिनिधी |

जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या शासकीय योजनेनुसार नेरळ येथील रेनबो इंग्लिश स्कूलमध्ये मुलींच्या स्वसंरक्षण व शारीरिक विकासासाठीचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले. या प्रशिक्षणाचा अनेक मुलींनी लाभ घेतला. नेरळमधील नालंदा अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक अविनाश एम. जाधव, जीवन धाकवाल आणि अभिषेक घडशी यांनी सलग 40 दिवस आपला बहुमूल्य वेळ देऊन मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींच्या पालकांनी समाधान व्यक्त केले असून शिक्षकांचे आभार मानले. महिला सक्षमीकरणाबरोबरच त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणे हे फार महत्त्वाचे असून शासनाने ही मोहीम अधिक व्यापक करण्याची गरज आहे. तसेच, रेनबो इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका मनीषा सावंत यांनी शासन आणि प्रशिक्षकांचे आभार व्यक्त करत असतानाच मुलांच्या शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे अभिवचन यावेळी दिले.

Exit mobile version