41 रुग्णांची केली तपासणी
। कर्जत । वार्ताहर ।
कर्जतमधील डॉक्टर नाझीरकर यांच्या श्री नारायण हॉस्पिटलमध्ये मोफत मुत्ररोग निदान शिबिर संपन्न झाले. यावेळी 41 रुग्णांनी तपासणी करून घेतली.
जे.जे. हॉस्पिटल मुंबईचे यूरोलॉजीस्ट डॉ.प्रकाश संकपाळ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी श्री नारायण हॉस्पिटलचे डॉ. घन:श्याम नाझिरकर, नगरसेविका विशाखा जिनगरे, विजय जिनगरे, डॉ. अलका नाझिरकर, डॉ. किरण सोनावणे, डॉ. चिदानंद नाझिरकर, डॉ. शुभंकर नाझिरकर, किरण निचिते आदी उपस्थित होते. या शिबिरात मूत्रपिंड, मूत्रवाहिनी, मूत्राशय खडा, प्रोस्टेट संबंधित आजार, वारंवार लघवी होणे, लघवीला फेस येणे आदी आजारांवर जे.जे. हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश संकपाळ यांनी तपासणी करून मोफत औषधे दिली.