कर्जतमध्ये मोफत पेट्रोल वाटप

अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस उत्साहात

| वेणगाव | वार्ताहर |

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोफत पेट्रोल वाटप करण्यात आले.

वंचितच्या वतीने मोफत पेट्रोल वाटपाचे हे दुसरे वर्ष असून, याही वर्षी हिंदुस्तान पेट्रोल पंप दहीवली येथे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांच्या नेतृत्वखाली व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. कैलास मोरे, वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हरिश्‍चंद्र यादव, सुनील गायकवाड, जिल्हा सचिव अनिल गवळे यांच्या उपस्थितीत येणार्‍या 500 मोटारसायकलमध्ये मोफत पेट्रोल वाटप करून अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रदीप ढोले, लोकेश यादव, अशोक कदम, राजू ढोले, जगदीश गायकवाड, कमलाकर जाधव, शैलेश खोब्रागडे, सुनील मोरे, सुनील सूर्यवंशी, गणेश मोरे, शरद गायकवाड, सुनील गवळे, गणेश कांबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version