विनामूल्य संस्कार शिबिर संपन्न

| आगरदांडा | प्रतिनिधी |

श्रीगुरू सावर्डेकर महाराज संस्थापित रूद्ररेवा सेवा प्रतिष्ठान, आळंदी देवाची अंतर्गत श्रीगुरूमाता सेवाश्रम आयोजित विनामूल्य संस्कार शिबीर दि. 2 ते 9 मे या कालावधीत संपन्न झाले. सदरचे संस्कार शिबीर उसरोली येथील आगरी समजागृह येथे पार पडले.

या शिबिरामध्ये नांदगाव, मजगाव, उसरोली, वेळास्ते, काशीद व अन्य भागातील सुमारे 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आदर्श बालके व समाज निर्माण होण्यासाठी संस्कारवान बनविण्यासाठी सदरचे शिबीर घेण्यात आले होते. मे महिन्यात मुलांना सुट्टी असल्याने या संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये लहान मुलांना दररोज सकाळी सहा ते आठ या वेळेत योग, प्राणायाम, ध्यान, सूर्यनमस्कार, शारीरिक व बौद्धिक व्यायाम, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी योगासने, आदी शिकवण्यात आले. शिबिरात सहभाग घेतलेल्या मुलांसाठी अनेक लोकांनी मदत करून भोजन व अन्य कार्यक्रमासाठी मोठी मदत केली.

Exit mobile version