। नवी मुंबई । वार्ताहर ।
संविधान दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित घटना, इतिहास आणि त्यांच्या कार्याची माहिती सामान्य जनतेला मिळण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयामार्फत टूर सर्किटद्वारे 3 व 4 तसेच 7 व 8 डिसेंबर, या कालावधीत कोकणातल्या महाड येथील चवदार तळे आणि गांधारपाले बौध्द लेणी या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी नि:शुल्क एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन संचालनालय, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी दिली.
सहलीमध्ये पर्यटकांसाठी बससेवा, गाईड, अल्पोपहार, दुपारचे जेवण व पिण्याचे पाणी या सर्व सुविधा नि:शुल्क पुरविण्यात येणार आहेत. प्रथम येणार्यास प्रथम सेवा प्राधान्य या शर्तीवर सहलीचे आरक्षण स्विकारण्यात येणार असून 3 व 4 डिसेंबर च्या सहलीचे आगाऊ आरक्षण 1 डिसेंबर पर्यंत व दि.7 व 8 डिसेंबरच्या सहलीचे आगाऊ आरक्षण 5 डिसेंबर करणे अनिवार्य आहे.
आगाऊ आरक्षणासाठी तसेच सहली संदर्भात अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र.9930359384/9421051708 या क्रमांकांवर तसेच ddtourisum.kokan-mhgov.in या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा. या सहलींसाठीच्या बसेस सीबीडी, बेलापूर/कोकण भवन, नवी मुंबई या बसस्थानकांवरून नियोजित वेळेवर वर नमूद तारखांना सोडण्यात येतील. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालय कोकण विभाग, नवी मुंबईचे उपसंचालक (पर्यटन) हनुमंत कृ. हेडे यांनी केले आहे.