। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
श्री अंबिका योग कुटीर ठाणे, शाखा अलिबाग तर्फे रविवार दिनांक 04 डिसेंबर पासून कर्णिक सभागृह, पंतनगर अलिबाग येथे नवीन विनामूल्य त्रैमासिक योगाभ्यास वर्गाची सुरुवात होत आहे. या वर्गाच्या अभ्यासाने 1997 पासून आजपर्यंत परीसरातील अनेक नागरिकांनी पाठदुखी, कंबरदुखी, ऍसिडिटी, उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदय विकार अशा अनेक व्याधींवर मात केली आहे.
तसेच मानसिक शांतीचा लाभ करून घेतलेला आहे. वर्ग सकाळी 7.30 ते 9.30 ह्या वेळात होईल.वर्ग दर रविवारी दोन तास,असे सलग बारा रविवार चालतील. नवीन साधकांनाचार डिसेंबरलाच प्रवेश दिला जाईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाखा संचालक वीरेंद्र पवार (9422690058) यांनी केले आहे.