माणगाव, प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळा तालुक्यातील महागाव ग्रामपंचायत येथे शुक्रवार, दि. 11 ऑगस्ट रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीजवळ शिलाफलकाची उभारणी करून त्यावर प्रधानमंत्री यांचा संदेश व महागाव गावातील स्वातंत्र्यसैनिक गजानन नाचणकर यांच्या कार्याची नोंद त्या शिलालेखवार घेण्यात आली आहे. या शिलालेखाचे अनावरण यावेळी करण्यात आले. ग्रामस्थांनी मोठया संख्येने सहभागी होऊन पंचप्राण प्रतिज्ञा घेण्यात आली. ग्रामपंचायत सीमा हद्दीत 75 देशी झाडांची लागवड करण्यात आली. तसेच दोन मूठ माती अमृत कलशमध्ये जमा करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच सुषमा कांतीलाल कसबले, उपसरपंच सचिन जाधव, ग्रामपंचायत सदस्य कानू पिंगळे, वंदना कालेकर, मनीषा कापरे, नंदिनी कडव, ग्रामसेवक सुवर्णा तांबडे, ग्रामस्थ संतोष आमले, कृष्णकांत मानकर, गणेश दळवी, गंगाराम कोळी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.