। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यात स्वातंत्र्यदिन विविध सामाजिक, विधायक उपक्रमांच्या साथीने अत्यंत उत्साही व देशभक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी सु.ए.सोच्या शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालय व ग.बा. वडेर हायस्कूलमध्ये उत्कृष्ट सजावट करण्यात आली होती. यानिमित्ताने तिरंगा राष्ट्रध्वज हाती घेऊन घोषणाबाजी करीत शोभायात्रादेखील काढण्यात आली.
मायभूमीच्या रक्षणासाठी व तिरंग्याच्या सन्मानासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणार्या हुतात्मे व शूरवीर सैनिकांच्या स्मृतीस्तंभाला मान्यवरांकडून पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देशभक्तीपर प.पु.सा. प्रियमर साश्रीजी म. सा. आणि प.प.सा.श्रीयमरसाश्रीजी म.सा यांनी विद्यार्थ्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी दिशादर्शक व प्रेरक ठरणारे मार्गदर्शन केले. सु.ए. सो चे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, कार्यवाह गीताताई पालरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आजी माजी सैनिकांची ओवाळणी करून मोत्याची माळ व भेटवस्तू देऊन समस्त जैन समाज बांधवांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. या सैनिकांमध्ये शंकर पालांडे, सुनिल थले, सुरेश दंत, प्रसाद लखीमले, साजिद शेख, समीर साजेकर, मोरया महाडिक, श्री. वाडेकर, विजय तोंडे, संदेश बारस्कर, आदींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सचिव रविकांत घोसाळकर, पालीवाला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुधाकर लहूपचांग, मुख्याध्यापक बी. सी. घोडके, पालीवाला महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे प्राध्यापक संतोष भोईर, ग.बा. वडेर हाईस्कूल व व. ग. ओसवाल जुनियर कॉलेज शिक्षक सुरज मेंडण, महेश बारमुख, प्रशांत नागोठकर, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.या कार्यक्रमासाठी अक्षित जैन यांनी संपूर्ण महाविद्यालयाला तिरंगा फुगे लावून सजावट केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकित ओसवाल व आभार प्रदर्शन विक्रम काटकर यांनी केले.