| पनवेल | वार्ताहर |
इंटक व पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी ( 6 जानेवारी ) पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाटयगृहात आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ठीक 11 वाजता हा मेळावा होणार आहे.
या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीनिमित्त आज (मंगळवार दि.3 जानेवारी) पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत 6 जानेवारी रोजी आयोजित इंटक व पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळाव्यादरम्यान पनवेल शहर जिल्ह्याच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा, पनवेल अर्बन बँकेचे नवनिर्वाचित संचालक तसेच पनवेल उरण तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार, हात से हात जोडो अभियानासंदर्भात माहिती व नियोजन, अन्य पक्षातून काँग्रेसमध्ये येणार्यांचा पक्ष प्रवेश यासह विविध महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी ठाण्याचे माजी महापौर तथा पनवेल शहर जिल्हा काँग्रेस निरीक्षक सुभाष कानडे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभिजीत पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, ऍड.अरुण कुंभार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अखलाख शिलोत्री, तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला म्हात्रे, युवक जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, नौफिल सय्यद, मोहन गायकवाड, लतीफ शेख, मल्लिनाथ गायकवाड, अरविंद सावळेकर, वैभव पाटील, प्रताप गावंड, नित्यानंद म्हात्रे, विनया पाटील, माया अहिरे, प्रेमा अपाचा यांच्यासह सर्व पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.