। अलिबाग । प्रतिनिधी ।
‘योग हे आरोग्याचे दैवी वरदान आहे’, या संकल्पनेतून शनिवारी (दि. 21) पीएनपी वेश्वी संकुल येथे होली चाईल्ड सीबीएसई बोर्ड, स्टेट बोर्ड, मराठी माध्यमांच्या शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय तसेच बी. एड. कॉलेज यांनी पीएनपी संकुल सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सिद्धीज फिटनेस क्लबच्या प्रमुख प्रशिक्षिका सिद्धी वाकडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवत प्राणायाम, ध्यान आणि आसनांचे शास्त्रीय महत्त्व उलगडून सांगितले. विद्यार्थ्यांनी देखील अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्राणायाम व विविध योगासने करून कार्यक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
योगासने केल्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे बळकट होते, याची प्रभावी प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. शिक्षकवृंदही विद्यार्थ्यांबरोबर आनंदाने सहभागी झाले. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक तसेच विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.