शहीद सुधाकर शिंदेंवर अंत्यसंस्कार

| मुंबई | वृत्तसंस्था |
छत्तीसगड येथील नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या नांदेड जिल्ह्यातील बामणी येथील रहिवासी असिस्टंट कमांडर सुधाकर शिंदे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी मुखेड तालुक्यातील बामणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण तसेच जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी शहीद सुधाकर शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मोठा जनसागर उपस्थित होता.

Exit mobile version