सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम
| जालना | वृत्तसंस्था |
29 ऑगस्टला मी तुम्हाला शब्द दिला होता. बेमूदत उपोषण करून एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्याच्या आरक्षणाची विजयीयात्रा निघेल. हेच मी पुन्हा एकदा जाहीर करतो. आता माघार घेतली जाणार नाही. 23 ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण दिले नाही, तर मी टोकाचे उपोषण करणार आहे. मराठा समाजाने सज्ज व्हावे. पुढची दिशा 22 ऑक्टोबरलाच सांगितली जाईल. 10 दिवसांच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यापेक्षा जास्त दिवस वाट पाहण्याची आमची तयारी नाही.मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय आता माघार नाही. हे आंदोलन शांततेत होणार पण मराठे मागे हटणार नाहीत, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. ते जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जाहीरसभेत बोलत होते. त्यांच्या सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य लोकांनी उपस्थिती लावली.
मी राज्याला, केंद्राला विनंती करतो, मराठा समाजाला आरक्षण द्या, हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना तातडीने आरक्षण जाहीर करा, मराठे इकडे-तिकडे नाचण्यापेक्षा दिल्लीपर्यंत गुलाल घेऊन ट्रकच्या ट्रक घेऊन येतील. आम्हाला तुमच्या राजकारणाचे काही करायचे नाही. आम्हाला आमच्या लेकरांचे कल्याण करायचे आहे., असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजासाठी गठीत केलेली समिती बंद करा. तुमचे आणि आमचे ठरले होते. एका महिन्यात महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करा. महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिले तरी चालेल. पण, इतर प्रवर्गांप्रमाणे हा प्रवर्ग टिकला पाहिजे, तरच ते आरक्षण आम्ही घेणार, 50 टक्क्यांच्या वर आम्ही आरक्षण घेणार नाही, असे मनोज जरांगेंनी ठणकावून सांगितले.
आजचा दिवस मराठा समाजासाठी सुवर्णक्षण आहे.महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या वतीने सरकारला विनंती आहे, तुमच्या हातात 40 दिवसांपैकी 30 दिवस झालेत, राहिलेल्या दहा दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा.आतापर्यंत 21 लाख जमा झाले, 123 गावांतून 22 गावातल्या लोकांनी पैसे दिल. आपल्याकडे आणखी 101 गावे शिल्लक आहेत, त्यांच्याकडे पैसे जमा आहेत, पण ते आपण घेतलेले नाही, कारण हे आंदोलन पैशांसाठी नाही जनतेसाठी आहे, असे म्हणत जरांगे पाटलांनी संपूर्ण हिशोब जाहीर केला आणि भुजबळांना प्रत्युत्तर दिले. पुढे ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार मराठ्यांना डिवचणारा नेता तुमच्या पक्षाचा आहे, त्याला जरा समज द्या. माझ्या नादाला लागले तर मी सोडतंच नाही. गुणरत्न सादावर्ते यांचे नाव न घेता जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले. म्हणाले त्यांना समज द्या, मराठ्यांनी एकदा सूट दिली. मराठा आरक्षणाच्या विरोधात ते कोर्टात गेलेत, तो तुमचा कार्यकर्ता आहे. मराठ्यांना अंगावर घेऊ नका , याच मराठ्यांनी तुम्हाला 106 आमदार दिलेत, केंद्रात, राज्यात सत्ता आणायला मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, असे जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगेच्याप्रमुख मागण्यामराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावाकोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावीदर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्वे करावा. सर्वे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यापीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन , त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे.