रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील किल्ले बिरवाडी येथे शिवशंभो प्रतिष्ठान आणि बिरवाडी युवक मंडळ यांच्या वतीने विजयादशमी निमित्ताने गडपूजन व शस्त्रास्त्र पूजन करण्यात आले. याप्रसंगी बिरवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष नंदकुमार सावंत, भरत मुंगळे,श्रीकांत जंगम,राकेश महामुनी, सौरभ मुंगळे,मयूर मोरे,राकेश इंदुलकर, मयूर विचारे, सनी, कल्पेश साळवी,किरण भालेकर यांच्यासह शेकडो शिवप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित होते. बिरवाडी येथील युवा पुरोहित प्रसाद राणे यांनी गड व शस्त्रास्त्र पूजन या विधींचे पौरोहित्य केले.