• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

ग्रामस्वच्छता अभियानाचे जनक गाडगेबाबा

Varsha Mehata by Varsha Mehata
December 19, 2021
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
ग्रामस्वच्छता अभियानाचे जनक गाडगेबाबा
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बळवंत वालेकर

 संतांनी महाराष्ट्रात  लोकजागृतीचे काम केले. स्पृश्या अस्पृश्यता, जातीयवाद, अंधश्रद्धा, रुढी-परंपरा यांना खतपाणी घालणार्‍यांना भजन कीर्तनात फटकारले. गाडगेबाबांच्या या राष्ट्रीय कामाची नोंद महाराष्ट्र  शासनाने घेतली व ग्राम स्वच्छता अभियान सर्वत्र चालू केले. शिवाय प्रोत्साहनार्थ बक्षिसेही जाहीर केली.

महाराष्ट्र हे भारतातील अग्रगण्य व पुरोगामी विचारसरणीचे राज्य आहे.  येथील भूमी कसदार आहे. येथे सद्विचारांची पेरणी केल्यामुळे या भूमीत संत, महंत व पंत जन्मास आले. त्यांनी समाज सुधारणेचे, जातीयता निर्मुलनाचे व अंधश्रद्धा नष्ट करण्याचे काम केले. त्यात संत रामदास, संत तुकाराम, संत  नामदेव, संत चोखामेळा, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा इ. चा समावेश होतो. आपल्या  रांगड्या भाषेत भजन, कीर्तन करून समाजजागृती करणार्‍या व अस्वस्थतारुपी राक्षसास  पाताळात गाडणार्‍या गाडगे बाबा यांची 63 वी पुण्यतिथी सोमवारी दि. 20 रोजी  विविध  कार्यक्रमांनी साजरी होत आहे.  बाबांचे निधन 20 डिसेंबर  1956 रोजी झाले. सामान्य  माणसाने विशिष्ट ध्येयाने काम केले. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची जिद्द दाखविली तर असामान्यत्व प्राप्त होते. हे गाडगेबाबांनी सिद्ध केले. त्यांनी  भजन, कीर्तनामार्फत समाज जागृती करून अस्वच्छता रुपी महाराक्षसास गाडण्यासाठी जीवाचे रान केले. गलिच्छ व हलक्या दर्जाची कामे त्यांनी 150 वर्षांपूर्वी करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.या स्वच्छता दुताच्या कामाची नोंद महाराष्ट्र शासनाला घ्यावी लागली. म्हणून शासनाने करावे लागले. ग्रामस्वच्छता अभियान चालू करावे लागले. हीच यांच्या कामाची पावती होय.  
अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे सामान्य कुटुंबात जन्मलेल्या गाडगेबाबांचे पूर्ण नाव  डेबूजी हिंगरजी जाणोरकर होते. घरी अठराविश्‍व दारिद्य्र असल्यामुळे त्यांना शाळेचा उंबरठा चढता आला नाही.  बालपणापासून त्यांना घरातील    अनेक कामे करावी लागत. त्यात गुरे राखणे, रानात जाऊन  लाकडे आणणे, शहरात  जाऊन विकणे याचा समावेश  होता.  तीक्ष्ण बुद्धी,दांडगी स्मरणशक्ती व प्रचंड प्रतिभाशक्ती त्यांच्याकडे होती.त्यास निरीक्षण  शक्तीची  जोड मिळाली.
समाजात फिरताना जातीयवाद, अंधश्रद्धा, स्पृश्यापृश्यता, गरिबाची हेटाळणी, रुढी- परंपरा, व बुवाबाजीचे स्तोम त्यांना  आढळले. घरातील कर्ता धर्ता माणूस निधन पावल्यानंतर कुटुंब  उघडे पडते. कुटुंबात अन्नान्न दशा येते. हे पाहून  गाडगेबाबांचे मन हळहळत असे. कारण त्यांनी, बालपणापासून ही परिस्थिती अनुभविली होती.
ते नेहमी काट्या कुट्याचा मार्ग स्वीकारीत असत. वेळप्रसंगी  ते रक्तबंबाळ होत.   घरी भांडणे होत. पण त्यांनी  मार्ग बदलला नाही.
सुदैवाने त्यांना चांगला गळा लाभला होता. त्यांचा पहाडी आवाज  होता. परिस्थिती नुसार ते भजन-कीर्तन करून सर्वस्तरातील जनतेला आकृष्ठ  करण्याची कला त्यांना लाभली होती. अस्पृश्यता, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, बुवाबाजी, जातीयता यांच्याविरुद्ध वातावरण ते लिलया तयार करीत असत. त्यांची कवने प्रसंगानुरुप व अलिखित होती. शिवाय ते शाळेची पायरी चढलेले नव्हते.  म्हणून त्यांची अनेक कवने हवेत विरून गेली आहेत.  ब्रिटिशशाही नष्ट करण्यासाठी झगडणारे लोकमान्य टिळक व महात्मा गांधीच्या विचारसरणीचा पगडा त्यांच्यावर पडला होता.  स्वातंत्र्य चळवळीला बळकटी  आणणारी कवने त्यांच्या भजन कीर्तनात असत. सूक्ष्म निरीक्षण शक्ती, तीक्ष्ण बुद्धी, अमाप प्रतिभा शक्ती व प्रवाहाविरुद्ध  लढण्याची शक्ती असल्यामुळे व समाज हिताचा वसा घेतला  असल्यामुळे ते कोणासही घाबरत नसत.
 त्यांची भाषा रांगडी पण अर्थपूर्ण होती. शिवाय बोधप्रद होती.
ऊस डोंगा परि
रस नोहे डोंगा!
 काय भुललासी
वरलिया रंगा!
नदी डोंगा परि
जळ नोहे डोंगा!
 अशाप्रकारे त्यांची खेडवळ भाषा असली तरी आशयपूर्ण, कसदार, निर्मल व आशयपूर्ण  होती. म्हणून त्यांचा नाव, लौकिक होता.  
देवकी नंदन गोपाला. हे त्यांंचे आवडते भजन. भजना मार्फत त्यांनी रुढी-परंपरा, अज्ञान व भोळ्या समजुतींवर हल्ला चढविला. अस्वच्छतेवरही हल्ला चढवित. दोषांवरही प्रहार करीत.  साहित्यिक म्हणतात, सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे  रानात व  गाडगेबाबांना पहावे   कीर्तनात. महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ असलेले आचार्य  अत्रे म्हणतात गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील समाजवादाचे  चालते बोलते व्यासपीठ होते.
अभियान सर्वत्र राबवावे.
भजन व कीर्तन हा गाडगेबाबांचा ध्यास होता.  ते आस्तिक असल्यामुळे    देवादिकांवर त्यांची खप्पा मर्जी होती. सण समारंभात तसेच भजन कीर्तनात समाज एकत्रित  येण्यासाठी तसेच भेदभाव नष्ट होण्यासाठी गावोगावी मंदिरांची गरज होती. कारण मंदिर परिसरात प्रसन्न व भक्तीमय वातावरण असते. या वातावरणासाठी जुन्या मंदिरांची दुरुस्ती अगर नवीन मंदिरे बांधणे गरजेचे होते. त्यासाठीगाडगेबाबांनी ऋणमोचन येथे लोकवर्गणीतून लक्ष्मी- नारायणाचे मंदिर उभारले. तसेच   पंढरपूर, नाशिक, देहू, आळंदी इ. ठिकाणी भक्तगण  हजारोंच्या संख्येने जातात. म्हणून तेथे  लोकसहभागातून धर्मशाळा व स्वच्छतागृहे बांधली.  यामुळे  ते भाविकांमध्ये प्रिय झाले. अंधश्रद्धा, जातीयता, रुढी परंपरा यांच्यावर प्रहार करणारी भजन कीर्तने केल्यामुळे त्यांना विरोध दांभिक मंदिर व धर्मशाळा  बांधण्यात पुढाकार घेणार्‍या  गाडगेबाबांवर स्तुतीसुमने उधळू लागले.
संतांनी महाराष्ट्रात  लोकजागृतीचे काम केले. स्पृश्या अस्पृश्यता, जातीयवाद, अंधश्रद्धा, रुढी-परंपरा यांना खतपाणी घालणार्‍यांना भजन कीर्तनात फटकारले. त्यांच्या या राष्ट्रीय कामाची नोंद महाराष्ट्र  शासनाने घेतली व ग्राम स्वच्छता अभियान सर्वत्र चालू केले. शिवाय प्रोत्साहनार्थ बक्षिसेही जाहीर केली.
संतांनी महाराष्ट्रात लोकजागृतीचे काम केले.  जातीयवाद, अंधश्रद्धा, विषमता नष्ट करण्याचे प्रयत्न केले. भजन-कीर्तनत रमले. अस्वच्छतेवर प्रहार केला. समाज सुधारण्यासाठी प्रवाहाविरुद्ध  जाण्याचे धाडस दाखविले.  समाज आरोग्यशील बनण्यासाठी, आयुर्मान वाढण्यासाठी तसेच समाज स्वास्थ्यासाठी आणि खेडी आरोग्यशील बनण्यासाठी  स्वच्छता राखली पाहिजे. हे अवघड काम भजन-कीर्तनाच्या माध्यमातून गाडगेबाबांनी केले.
आरोग्यशील समाज  बनविण्याचे काम स्वच्छता करते. स्वच्छता हाच  समाजाचा परमेश्‍वर आहे.  म्हणून या परमेश्‍वराची पूजा-  अर्चा दररोज व्हायला हवी.   आरोग्य मंदिरात स्वच्छतेचे    नियम आमजनतेस समजावून  द्यायला हवेत. घरोघरी स्वच्छतागृह असायलाच हवे. ते दररोज स्वच्छ करावे. त्यासाठी मुबलक पाण्याची सुविधा  हवी. घर बांधण्याचा परवाना देताना शौचालय व भरपूर पाणी ही अट ग्रामपंचायतीने घर मालकावर टाकावयास हवी स्वच्छतेबाबत ईर्षा निर्माण होण्यासाठी ग्रामपंचायतींच्या स्पर्धा तालुका जिल्हा व राज्य पातळीवर आयोजित कराव्यात. पहिल्या  तीन क्रमांकाना प्रोत्साहनार्थ बक्षिसे द्यावीत. या उपक्रमात खंड पडू नये.
महाराष्ट्र शासनाने ग्र्रामस्वच्छता अभियान  राबविल्यामुळे गल्लीबोळातील घाणीचे साम्राज्य लोप पावले.  रोगराई कमी झाली. मृत्यूचा दरही कमी झाला. वातावरणात  प्रसन्नता व निर्भयता वाढली.  गेली 2 वर्षे कोरोना या महाविषाणूचे साम्राज्य वाढत आहे. या महाविषाणूने  हजारोंचा बळी घेतला आहे. सर्वत्र स्वच्छता राखणे हा त्यावर उपाय आहे. स्वच्छतेच्या प्रसारासाठी गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अधिक गतिमान करणे गरजेचे आहे. म्हणून राज्याच्या  माहाविकास आघाडीने   थंडावलेल्या ग्रामस्वच्छता अभियानास प्रोत्साहन द्यावे, हीच गाडगेबाबांना श्रद्धांजली ठरेल.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

हिम्मत असेल तर राजीनामा द्या- अमित शहा

Next Post

रायगडातील बळीराजाचा उद्रेक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

रायगडातील बळीराजाचा उद्रेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?