गेलच्या उरण-उसर प्रोपेन पाइपलाईन प्रकल्पाला वेग

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

रायगडातील 35 गावांत काम प्रगतीपथावर

। पेण । प्रतिनिधी ।

गेल इंडिया लिमिटेड यांच्या उरण-उसर प्रोपेन पाइपलाईन प्रकल्पाचे काम रायगड जिल्ह्यात वेगाने सुरू असून, उरण, पनवेल, पेण आणि अलिबाग तालुक्यातील एकूण 35 गावांमधून ही पाइपलाईन टाकण्यात येत आहे. ही माहिती उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी (महाराष्ट्र राज्य), सीबीडी बेलापूर, नवी मुंबई यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

पेट्रोलियम व खनिज पाइपलाईन कायदा 1962 अंतर्गत या प्रकल्पासाठी जमिनीच्या वापराचे हक्क संपादन करण्यात आले आहेत. प्रकल्पामध्ये उरण तालुक्यातील 7, पनवेल तालुक्यातील 2, पेण तालुक्यातील 13 आणि अलिबाग तालुक्यातील 13 गावांचा समावेश आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, उरण, पनवेल आणि अलिबाग तालुक्यांमध्ये 100 टक्के पंचनामा प्रक्रिया पूर्ण झाली असून, नुकसान भरपाई वाटपाचे काम सुरू आहे. संबंधित शेतकरी नुकसान भरपाईची रक्कम स्वीकारत असून, या तीन तालुक्यांमध्ये पाइपलाईन टाकण्याचे सुमारे 80 टक्के काम पूर्णत्वाकडे पोहोचले आहे.

दरम्यान, पेण तालुक्यातील 13 गावांपैकी 7 गावांमध्ये पंचनामा प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्या ठिकाणी नुकसान भरपाई वाटपाबरोबरच पाइपलाईन टाकण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याकारणाने प्रधानमंत्री गतीशक्ती पोर्टलमध्ये समविष्ट असून या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून राज्याच्या मुख्य सचिवाना पत्रव्यवहार करून प्रकल्पाला योग्य ते सहकार्य व गती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व संबंधित विभागांनी तसेच प्रशासनाने यासंदर्भात योग्य ती कार्यवाही व समन्वयाने काम करावे, असे निर्देश रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version