गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

श्री गजानन महाराज शेगांव यांचा प्रगट दिन सोहळा सालाबादप्रमाणे रविवारी (दि.3) अवधुत आठवले यांच्या नागांव बंदर रोड-अलिबाग येथील निवासस्थानी साजरा होणार आहे. या निमित्ताने सकाळी नऊ वाजता महाराजांचे पुजन व अभिषेक, दुपारी बारा वाजता महाप्रसाद, सायंकाळी चार वाजता तीर्थप्रसाद व रात्री नऊ वाजता अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सोहळ्यास अपस्थित राहून भक्ति रसाचा आनंद घेण्याचे आवाहन आठवले तसेच समस्त गजानन महाराज परीवारातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version