चक्रीच्या जुगाराला परवानगी देऊ नये

उरणच्या महिला वर्गाची मागणी

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यात यात्रा, क्रिकेट व इतर खेळांचा हंगाम सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात चक्रीच्या जुगाराचे डाव रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी या चक्रीच्या जुगारांना पोलिसांनी परवानगी देऊ नये, अशी मागणी महिला वर्गाकडून जोर धरू लागली आहे.

उरण तालुक्यातील गावोगावच्या यात्रांचा हंगाम सुरू होत आहे. त्याच बरोबर नाईट क्रिकेट व इतर खेळांचे सामनेदेखील मोठ्या प्रमाणात तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपन्न होत असतात. यादरम्यान, चक्रीच्या जुगाराचा डाव मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

दोन दिवसांवर उरण शहरातील दत्त जयंतीची यात्रा संपन्न होणार आहे. यावेळी शहरातील काही ठिकाणी चक्रीचा जुगाराचा डाव रंगणार आहे. त्यानंतर यात्रा व क्रिकेट सामने सुरू होतील. त्यावेळीही चक्रीचा जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असतो. चक्रीचा जुगार हा रात्रीच्या वेळेस कुठल्या तरी कोपर्‍यात सुरू असतो. त्यावेळी चक्रीचा जुगारवाले आम्हांला परवानगी दिली असल्याचे खोटेनाटे सांगून वेळ मारून नेत असतात. तरी, उरणमधील तीनही पोलीस ठाण्याने अशा चक्रीच्या जुगारांना परवानगी देऊ नये, अशी मागणी महिला वर्गांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे केली आहे.

Exit mobile version