घाटकोपरमध्ये घरगुती गणेशोत्सव ऑनलाईन स्पर्धा

अव्वल 25 स्पर्धकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव
। मुंबई । प्रतिनिधी ।
घाटकोपर (प.) येथील नित्यानंदनगर विभागीय घरगुती गणेशोत्सव ऑनलाईन स्पर्धेचा निकाल नुकताच स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि आभारपत्र देऊन संपन्न झाला. मातोश्री या सामाजिक संस्थेने दुसर्‍या वर्षी आयोजित केलेल्या या स्पर्धेत विभागातील एकशे पाच स्पर्धकांनी ऑनलाईन प्रवेश घेतला होता. संस्थेच्या वतीने परीक्षणात अव्वल ठरलेल्या पंचवीस स्पर्धकांना यावेळी त्यांच्या घरी जाऊन उत्कृष्ट आरास, उत्कृष्ट सजावट आणि उत्कृष्ट मूर्ती या विविध कलाकृतींसाठी सन्मानचिन्ह आणि आभार पट प्रदान करण्यात आले.

दरम्यान, संस्थेच्या या अभिनव उपक्रमाची चर्चा संपूर्ण परिसरात होत असून, पुढील वर्षी या स्पर्धेची व्याप्ती वाढविणार असल्याचे अध्यक्ष गिरीश फडतरे यांनी सांगितले. तर, सुरेश कुर्‍हे, निलेश कदम, सूर्यकांत शिंदे योगेश काळे (कॅमेरा), अमित मंडलिक, अजय दीक्षित, प्रशांत जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Exit mobile version