। बंगळुरू । वृत्तसंस्था ।
कर्नाटकातील म्हैसूरमध्ये तेवीस वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना धक्कादायक घटना समोर आली असून देशात पुन्हा एकदा निर्भया घटनेची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असल्याकारणाने पोलिसांनी तिच्या मित्राचा जबाब नोंदविला आहे. यानुसार, पीडिता त्याठिकाणी शिकण्यासाठी आलेली असून ती तिच्या मित्रासोबत सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जंगल परिसरात असलेल्या हेलिपॅडकडे गेली होती. त्यावेळी चार ते पाच जण त्यांचा पाठलाग करत होते. सर्व आरोपी मद्याधुंद अवस्थेत होते. त्यांनी सुरुवातील या दोघांना लूटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर विद्यार्थिनीला झुडपात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यावेळी तिच्या मित्राने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.
हे प्रकरण फार संवेदनशील असून याबाबत आम्ही अधिक माहिती देऊ शकत नाही. दरम्यान तिच्या मित्राचा जबाब नोंदविला आला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही विशेष टीम तयार करत असून सर्व बाजूने चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हैसूरचे पोलिस आयुक्त चंद्रगुप्ता यांनी सांगितले. मात्र याप्रकरणानंतर पुन्हा एकदा दिल्लीत घडलेल्या निर्भयाप्रकरणाची आठवण होत, देशातील महिला सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.