| पुणे | प्रतिनिधी |
एका 32 वर्षीय महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून सामुहिक अत्याचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तिला आधी धर्मांतर करण्यासाठी देखील प्रवृत्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी सामूहिक बलात्कार प्रकरणी दोघा पुरुषासह एका महिलेवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित 32 वर्षीय महिला पुण्यातील लोहगाव परिसरात राहायला असून एका जिम ट्रेनरकडं जिम लावण्यासाठी गेल्यानंतर तिथं तिची दोघा आरोपींशी ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर त्यांनी तिला धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केलं त्यानंतर 55 वर्षे आणि 30 वर्षीय अशा दोन आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवत या दोघांनी तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार करून मोबाईलमध्ये त्याचे व्हिडिओ काढून व्हयरल करण्याची दिली धमकी दिली आहे.