| पालघर | प्रतिनिधी |
कानात इअरफोन घालून रेल्वेरूळ ओलांडणे एका सोळा वर्षांच्या विद्यार्थिनीच्या जीवावर बेतले आहे. सफाळे रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेरूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. वैष्णवी मयूर रावल असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
वैष्णवी मयूर रावल ही सोळा वर्षाची इयत्ता दहावीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पालघर तालुक्यातील माकणे येथे रहिवासी असून तिचा क्लास संपवून घराकडे निघाली होती. माकणे येथे जाण्यासाठी सफाळे रेल्वे स्थानक परिसरातून पूर्वेकडून पश्चिमेकडे जावे लागते. पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानक परिसरातून सफाळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडात असताना, किमान तेव्हा ती ट्रेनची आवाज ऐकू शकली असती, पण इअरफोन घालून ती मग्न होती. या प्रकारामुळे वैष्णवीला ट्रेनची आवाज ऐकू आला नाही. रेल्वेरूळ ओलांडत असताना मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव राजधानी एक्स्प्रेस ट्रेनने तिला जोरदार धडक दिली.
भरधाव ट्रेनच्या धडकेत वैष्णवी गंभीररीत्या जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास तुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.