| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील गोरेगावमध्ये एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिच्या सिझेरियन ब्लेड आणि दगडाने गुप्तांगावर हल्ला केला. अज्ञात रिक्षाचालकाने हे कृत्य केले आहे. पीडित तरुणी गोरेगावमधील राम मंदिर स्टेशनच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत आढळली. याबाबत वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.21) या प्रकरणाबद्दल माहिती मिळाली. पीडित तरुणीला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी पीडितेच्या गुप्तांगातील सीझेरियन ब्लेड आणि काही दगड बाहेर काढले आहेत. पीडित तरुणी नालासोपारा येथील आहे. वनाराई पोलिसांनी रिक्षा चालकाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.