। महाड । प्रतिनिधी ।
महाडमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चक्क पित्यानेच स्वतःच्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर चार-पाच वर्ष लैंगिक अत्याचार केले. वारंवार केलेले अत्याचार सहन न झाल्याने अखेर मुलीने महाड एमआयडीसी हद्दीतील पोलीस ठाण्यात पित्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.