कोल्ड्रिंक्स पाजून केले बेशुद्ध
। मुंबई । प्रतिनिधी ।
एका 22 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. घटनेतील पीडित तरुणीला कामाचे पैसे देतो असे सांगून आरोपीने घरी बोलावले आणि कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी भाजपाच्या नेत्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
2021 साली होळीच्या दिवशी 22 वर्षीय पिडीत तरुणीला कामाचे पैसे देतो असे सांगून आरोपी भाजप नेते संजू गंगेश्वर श्रीवास्तव यांनी खोलीवर बोलावले. तिच्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला कोल्ड्रिंक पाजत बेशुद्ध केले. त्यानंतर आरोपी संजू श्रीवास्तव आणि नवीन सिंग यांनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. विशेष म्हणजे यावेळी नवीन सिंग याची पत्नी हेमा सिंग हिने या संपूर्ण घटनेचा अश्लील व्हिडिओ तयार केला. तसेच हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी आरोपीने शारीरिक संबंध ठेवले. यातूनच गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात करण्यासाठीची औषधे पिडीतेला देऊन गर्भपातदेखील करण्यात आला.
पीडित महिलेला आरोपीपासून एक मुलगीदेखील झाली असून सध्या पीडित महिला एक महिन्याची गरोदर आहे. पीडित महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी देखील अनेक वेळा देण्यात आली. पीडितेला हे सर्व अत्याचार सहन न झाल्याने तिने आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणी आरोपी संजू श्रीवास्तव, नवीन सिंग आणि नवीन सिंग याची पत्नी या तिन्ही आरोपी विरोधात आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर, पोलीस या सर्व आरोपींचा शोध घेत आहेत.