गॅस शवदाहिनी नादुरूस्त

माथेरानमध्ये मृतांवर अंत्यसंस्कार करताना अडचणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान येथील हिंदू स्मशानभूमी मधील गॅस शवदाहिनी नादुरुस्त झाली आहे. त्यात माथेरानमध्ये इको सेन्सेटिव्ह झोनमुळे लाकडे तोडण्यास बंदी आहे. त्यामुळे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास अनेक अडचणी येत आहेत.्र तर दुसरीकडे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्थानिक श्रमदान करून लाकडांचे ओंडके वाहून स्मशानभूमी पर्यंत नेत आहेत.

माथेरान मध्ये सर्व हिंदू समाजातील व्यक्तींसाठी येथे एकमेव स्मशानभूमी आहे. याचा वापर येथील सर्व समाज यांच्याकडून केला जातो. या स्मशानभूमीमध्ये डिझेलवर चालणारी शवदाहिनी आहे. तसेच लाकडावर जाळण्याची व्यवस्था देखील आहे. मागील काही महिन्यांपासून येथील डिझेलवर चालणारी शवदाहिनी ही नादुरूस्त झाली आहे. तसेच त्याठिकाणी लाकडांची अपुरी व्यवस्था असल्याने मृतदेहावर अंत्यविधी करण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकरिता ही नादरूस्त झालेली शवदाहिनी त्वरित दुरूस्त करून सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


दरम्यान येथे अंत्यसंस्कार वेळेस लाकडाचा तुटवडा भासू नये यासाठी गावातील नागरिकांना एकत्रित करून श्रमदानातून लाकडांचा डेपो स्मशानभूमीत तयार केला आहे. माथेरान गिरीस्थान नगरपालिका अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या अनुदानातून बसविण्यात आलेली डिझेल शवदाहिनी गेल्या महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. यापूर्वी सदरची बाब वारंवार नगरपालिकेच्या निदर्शनास आणू होती. परंतु संबंधित विभागाकडून कोणतीही दखल घेतली गेली ना याबाबत तात्काळ योग्य ती कारवाई नागरिकांच्या धार्मिक, हक्काकरिता जनआंदोलन पुकारले जाईल अशी माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version