कारखान्यात गॅस लीक; 17 कामगारांची प्रकृती चिंताजनक

| पुणे | प्रतिनिधी |

पुणे शहराजवळ यवतजवळील भाडगाव येथे बुधवारी (दि.7) सकाळी रेडी-टू-ईट फूड प्रोसेसिंग यूनिटमध्ये ही घटना घडली आहे. फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया वायूची गळती सुरु झाली. कारखान्यात घटना घडली तेव्हा 25 जण काम करत होते. त्यातील 17 जण अमोनिया गॅसची गळती होणाऱ्या भागाच्या जवळ होते. यामुळे सर्वांना त्रास होऊ लालगा. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अमोनियाचा त्रास झालेल्या 17 पैकी 16 कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु आयसीयूमध्ये दाखल असलेल्या महिलेवर उपचार सुरु आहे. तिची प्रकृतीही धोक्याबाहेर असल्याचे समजत आहे.

Exit mobile version