साई नगर खांब आयोजित क्रिकेट सामन्यात गावदेवी बाहे संघ अंतिम विजेता

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील अजिंक्य क्रिकेट क्लब साई नगर खांब आयोजित क्रिकेट सामन्यात गावदेवी बाहे संघ ठरला स्पर्धेत अंतिम विजेता बाहे व धाक्सुद चिल्हे यांच्यात झालेल्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर गावदेवी बाहे संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला तर धाक्सुद चिल्हे संघाला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच स्पर्धेतील तृतीय क्रमांक साई नगर खांब हा संघ मानकरी ठरला. उत्कृष्ट सामनावीर गावदेवी बाहे संघाचा राहुल थिटे, स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज गावदेवी बाहे संघाचा मनोज थिटे तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून साई नगर खांब संघाचा मंदार पार्टे यांना गौरविण्यात आले.
खांब विभागीय क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने अजिंक्य क्रिकेट क्लब साई नगर खांब यांनी रविवारी 13 मार्च रोजी आयोजित केलेल्या स्पर्धा मुठवलीच्या प्रांगणात क्रिकेट सामन्याचे उद्घाटन निलेश निळेकर, अविनाश म्हात्रे,अजय भोसले, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर क्रिकेटपटू क्रीडा रसिक प्रेषक आदी अजिंक्य क्रिकेट क्लब व खांब क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version