वृद्धाश्रम संस्थेची सर्वसाधारण सभा

। अलिबाग । वार्ताहर ।

अलिबाग येथील शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्रांची सर्वसाधारण सभा रविवारी (दि.23) डॉ. सुभाष म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीबाग येथील श्रीमती भारती दीनानाथ तरे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेला संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष म्हात्रे, योगेश तरे, डॉ. प्रतिभा म्हात्रे, प्रफुल्ल राऊत, डॉ. जगदीश थळे, डॉ. सुरेश म्हात्रे, डॉ. प्रशांत जन्नावार, डॉ. अनिल डोंगरे, शरद कोरडे यांच्यासह गजेंद्र दळी, भारती तरे, चारुशिला कोरडे, द्वारकानाथ नाईक, आर.के. घरत, पुरुषोत्तम साठे, सुभाष क्षिरे, मंगला सावंत, उमाजी केळुसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version