जय वीर हनुमान मित्र मंडळ आयोजित स्पर्धेत जर्मन रायडर्स संघ विजयी


। मुंबई । वृत्तसंस्था ।
मिरारोड शहरातील पेणकर पाडा जयवीर हनुमान मित्र मंडळाची प्रिमियर लीग मोठ्या उत्साहात संपन्न झाली. गेली दोन वर्ष सातत्याने अंडरआर्म बॉक्स प्रीमियर लीगची स्पर्धा पेणकर पाड्यात खेळविल्या जातात. या स्पर्धांचरा शुभारंभ माजी नगरसेविका मंदाकिनी गावंड, माजी नगरसेवक आत्माराम गावंड, सभापती अनिता पाटील, नगरसेवक मोहन म्हात्रे, आ.गीता जैन, शिवसेना महिला उपशहर संघटक रिया म्हात्रे, हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपेश गावंड व अन्य पदाधिकारी क्रिकेट संघाच्या उपस्थित करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्पर्धेदरम्यान सदिच्छा भेटी दिल्या. यावेळी आयोजकांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
जयवीर हनुमान मित्र मंडळ पेणकर पाडा अंडरआर्म बॉक्स प्रीमियर लीग नोंदणीकृत 10 नामवंत संघांनी क्रिकेट स्पर्धेला सहभाग नोंदविला होता. यामध्ये विजेता संघ जर्मन रायडर्स संघ, उपविजेता हरेश नंदा गावंड स्पोर्ट्स आरिना संघ यांनी 2022 या चषकावर नाव कोरले. तसेच जर्मन रायडर्स संघाचा सागर चव्हाण यांनी उत्कृष्ट फलंदाज तर नंदा गावंड स्पोर्ट्स आरिना संघाचा श्रीहरी देसाई यांनी उत्कृष्ट गोलंदाज किताब पटकावला. अंतिम फेरीत विजेता उपविजेता अशा कामगिरीबद्दल त्यांच्या खेळाचा गौरव म्हणून आकर्षक पदक देऊन सहभागी झालेल्या 10 क्रिकेट संघाना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण सामन्याचे सुंदर असे समालोचन विवेक तुरे, बाजीराव दोंद, दिपेश गावंड, पियुष गावंड यांनी करून खेळाडूना प्रोत्साहित केले.

Exit mobile version