| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची उरण तालुक्यातील माध्यमिक शाळा भेंडखळ या शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये कंपास बॉक्स, शाळेसाठी ग्रिनबोर्ड, शाळेसाठी इंटरनेट कनेक्शन व विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप करण्यात आले तसेच भेंडखळ गावातील दानशूर उद्योजक संकल्प महादेव घरत यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांनी शाळेस संगणक भेट दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी संकल्प महादेव घरत, महादेव कृष्णा घरत, रमेश तुळशिराम ठाकूर, यशवंत म्हात्रे, शाळेचे चेअरमन काशिनाथ ठाकूर, भेंडखळ ग्रामपंचायत सदस्य अभिजित ठाकूर तसेच माजी विद्यार्थी स्वप्निल घरत, पंकज घरत, प्रल्हाद पाटील, गिरिष घरत, गिरिष पाटील, महेंद्र ठाकूर, निनाद ठाकूर, अश्विनी घरत, वैशाली ठाकूर, कृष्णाली म्हात्रे, आरती भगत, शाळेचे मुख्याध्यापक शेखर म्हात्रे, लता पाटील, दहिता म्हात्रे, संचिता म्हात्रे, रूपेश कालेकर आदि उपस्थित होते. या प्रसंगी संकल्प घरत, महादेव घरत, यशवंत म्हात्रे, काशिनाथ ठाकूर, स्वप्निल घरत यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तर शाळेचे मुख्याध्यापक शेखर म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानले.