मरीआई प्रासादिक भजन मंडळास हार्मोनियम भेट

। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील भाकरवड गावच्या तरुण मंडळींनी गावात हरिनाम जागर चालू होण्यासाठी प्रासादिक संगीत भजन मंडळाची स्थापनी केली. या मंडळात एकूण 21 सभासद असून, महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. कोठेकर कुटुंबियांनी मंडळास हार्मोनियम भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

कुसुंबळे येथील संदीप कोठेकर यांनी भजन मंडळास त्यांचे वडील स्व. दत्तात्रेय शंकर कोठेकर व सासरे स्व. गोपीनाथ सीताराम पाटील भाकरवड यांच्या प्रित्यर्थ हार्मोनियम देण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे त्यांनी स्वतः चिपळूण हार्मोनियमची खरेदी करुन ती मंडळास भेट दिली.
याबद्दल मंडळाचे खजिनदार राजेंद्र पाटील व सर्व सभासदांनी या कोठेकर कुटुंबाचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version