चोरढे शाळेला लॅपटॉपची भेट

। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन तडढऋ आदर्श शाळा विकास कार्यक्रम टप्पा-2 अंतर्गत निवडलेली मुरूड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा चोरढे या शाळेला गावातील पालकवर्ग व शिक्षकगण यांच्याकडून रुपये 37500/- किंमतीचा एक लॅपटॉप भेट म्हणून प्रदान करण्यात आला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालकवर्ग व शिक्षकगण यांना अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती गुरव यांनीही शाळेला भेट दिली.

Exit mobile version