सह्याद्री महिला ग्रामसंघातर्फे जीवनावश्यक वस्तूंची भेट


| बोर्लीपंचतन । वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे महाराष्ट्र राज्य जिवनोन्नती अभियान(उमेद) अंतर्गत स्थापन झालेल्या सह्याद्री महिला ग्रामसंघाच्यावतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सह्याद्री महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा मानसी जाधव यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामसंघाला संलग्न असणार्‍या स्वयंसहायता समूहाच्या पदाधिकारी आणि सर्व महिला सदस्य यांच्या सहकार्याने गावातील 15 कुटुंबांना जीनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. सामाजिक उपक्रमाबाबत सह्याद्री महिला ग्रामसंघाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिती मयेकर यांनी केले होते. याप्रसंगी श्रीवर्धन पंचायत समिती तालुका अभियान व्यवस्थापक इंद्रजीत बनसोडे, पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक श्रीमंत नावडे, ज्योती परकर, आशा पवार, मुमताज हद्दादी, आदिती मयेकर, स्वयं सहाय्यता समूहाच्या पदाधिकारी आणि सर्व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version