। श्रीवर्धन । वार्ताहर ।
गोखले एज्युकेशन श्रीवर्धन येथील महाविद्यालय व सह्याद्री मित्र फाऊंडेशन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने यूपीएससी स्पर्धा परीक्षा परीक्षेचे स्वरुप, प्रश्नपत्रिकांचे स्वरुप वेळेचे व अभ्यासाचे नियोजन यासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या आयोजनाची भूमिका व रुपरेषा, करिअर मार्गदर्शन विभाग प्रमुख डॉ. निलेश चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केली.
ग्रामीण भागात अशा परीक्षांसाठी जनजागरण करण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात अशा स्पर्धा परीक्षांसाठी उदासीनता आणि अनभिज्ञता आहे. किंबहुना स्पर्धा परीक्षेचा आमचा विद्यार्थी विचारही करीत नाही. मात्र, आम्ही जाणीवपूर्वक काही तल्लख विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देणार आहोत, अशी भावना प्रा. डॉ. श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केली. सह्याद्री मैत्री फाऊंडेशनचे राकेश दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवज्योत जावळेकर यांनी केले. कार्यशाळेस म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील सुमारे 140 विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शन उपप्राचार्य किशोर लहारे यांनी केले.