वारक शाळेला स्मार्ट टीव्ही, समाजसुधारकांच्या प्रतिमा भेट

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील वारक येथील जिल्हा परिषद शाळेला उषःकाल फाऊंडेशनकडून स्मार्ट टीव्ही व समाजसुधारक यांच्या प्रतिमा वितरण करण्याचा कार्यक्रम शनिवारी (दि.6) संपन्न झाला. याप्रसंगी गावातील मान्यवर, शिक्षणप्रेमी, पालक व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. उषःकाल फाऊंडेशनच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शाळेचे मुख्याध्यापक धुमाळ व त्यांचे सर्व सहकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा, व सदस्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. अरुणा वाढवळ यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून जे स्तुत्य कार्यक्रम आयोजित करीत आहे, त्यास शुभेच्छा दिल्या. उषाताई, आदिप बंधू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण जे शैक्षणिक कार्य करीत आहात व फुलझाडे देत आहात, ती झाडे फुले बहरतील, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी नामदेव दामाजी शिंदे यांनी दिवंगत पत्नी उषा शिंदे व बंधू आदिप शिंदे यांच्या स्मृती जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. स्वतःच्या गावासाठी उषःकाल फाऊंडेशनकडून यथाशक्ती सर्व प्रयत्न केले जातील, याची ग्वाही दिली.

Exit mobile version