। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागासाठी सामाजिक कार्य करणारे नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्टकडून डिकसळ गावातील 80 वर्षीय महिलेला व्हील चेअर भेट देण्यात आली. चंद्रभागा चंदर गायकवाड यांना वृद्धापकाळाने चालता येत नाही आणि त्यामुळे मधुकर गायकवाड यांच्या मागणीनुसार श्री साई ट्रस्टकडून व्हील चेअर भेट देण्यात आली.
कर्जत तालुक्यातील डिकसळ गावातील कवी मधुकर चंदर गायकवाड यांच्या मातोश्री चंद्रभागा गायकवाड यांचे वय 80 वर्षे असल्याने त्यांना वृद्धापकाळाने चालता येत नाही. त्यामुळे चंद्रभागा गायकवाड यांच्या साठी श्री साई ट्रस्टकडून व्हील चेअर देण्यात यावी, अशी मागणी ट्रस्टच्या संचालक राधिका घुले यांच्याकडे पत्र देऊन केली होती. त्यानंतर श्री साई ट्रस्ट कडून तात्काळ 80 वर्षीय चंद्रभागा चंदर गायकवाड यांच्यासाठी व्हील चेअर उपलब्ध करून देण्यात आली. हि व्हील चेअर डिकसळ येथील चंद्रभागा गायकवाड यांच्या घरी जाऊन देण्यात आली. यावेळी राधिका घुले यांच्यासह किशोर गायकवाड, अशोक गायकवाड, अॅड. उत्तम गायकवाड, निखिल गायकवाड आणि प्रणव गायकवाड आदी उपस्थित होते.