गिलला क्रिकेटर ऑफ द इयर

| नवी दिल्ली | प्रतिनिधी |

भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले जाईल. तर, भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. पीटीआयच्या माहितीनुसार, 15 मार्च रोजी दिल्लीत बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार सोहळा होईल.

या व्यतिरिक्त, आयुष म्हात्रेला लाल अमरनाथ पुरस्काराने सन्मानित केले जाईल. म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने याच वर्षाच्या सुरुवातीला अंडर-19 एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. राहुल द्रविड व्यतिरिक्त मिताली राजलाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या व्यतिरिक्त, देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी मुंबई असोसिएशनला सर्वोत्कृष्ट क्रिकेट असोसिएशनचा पुरस्कार दिला जाईल. मात्र, याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 2025 मध्ये भारतीय कर्णधार गिलची कामगिर उत्कृष्ट राहिली.

त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 983 धावा केल्या, ज्यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 70 पेक्षा जास्त सरासरीने केलेल्या 754 धावांचा समावेश होता. एकदिवसीय सामन्यांमध्येही गिलने 490 धावा केल्या आणि भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एकूणच, त्याने सर्व फॉरमॅटमध्ये 49 च्या सरासरीने 1764 धावा केल्या, ज्यात सात शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता.

Exit mobile version