। अलिबाग । वार्ताहर ।
कोकण विभागीय नागरी सहकारी संस्था फेडरेशन मर्या. अलिबाग या कोकणातील 5 जिल्ह्यात कार्यरत असणार्या फेडरेशनचे अध्यक्षपदी गिरीश तुळपुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडणूक मागील महिन्यात पार पडली असून कोकणातून 10 संचालक बिनविरोध निवडून आले होते. यामधून पदाधिकारी निवडण्याचा कार्यक्रम श्रीकांत पाटील अध्यासी अधिकारी यांची उपस्थित निवडणूक प्रक्रियेनुसार पूर्ण करण्यात आला. उपाध्यक्षपदी सुनिल राऊळ सिंधुदुर्ग, खजिनदार शशिकांत बांदोडकर रायगड तसेच सचिव संतोष तेराडे रत्नागिरी यांच्या निवडीही बिनविरोध करण्यात आल्या. तुळपुळे यांनी यापूर्वी रायगड जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तसेच राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव म्हणून काम केले असून राज्यभरातील संस्थांमध्ये मोठा संपर्क त्यांनी यापूर्वी साधला आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून चांगले काम उभे करता येईल असे मत सभासद संस्थांनी व्यक्त केले आहे.