यूपीएससी परीक्षेत मुलींची बाजी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. महत्वाचे म्हणजे पहिल्या चार क्रमांकावर मुली आहेत. 2021 च्या यूपीएससी निकालाचे हे मोठे वैशिष्ट्य आहे. युपीएससीने जाहीर केलेल्या या निकालामध्ये श्रुती शर्मा संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. तर अंकिता अग्रवालने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिसऱ्या क्रमांकावर गामिनी सिंगला तर चौथ्या क्रमांकावर ऐश्वर्या शर्माने बाजी मारली आहे. या निकालात पुण्याच्या अक्षय वखारेनं 203 वा क्रमांक मिळवला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर UPSC CSE अंतिम निकाल 2021-22 जाहीर केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरुन त्यांचे कौतुक केले जात आहे.

Exit mobile version